ऐश्वर्या राय बच्चन व श्वेता बच्चन या दोघी नणंद-वहिनी फार कमी वेळा एकत्र दिसतात. त्यातही त्या एकमेकींशी संवाद साधताना फारशा दिसत नाहीत, त्यामुळे त्या दोघींचं एकमेकींशी पटत नसल्याच्या चर्चाही खूपदा होत असतात. मध्यंतरी तर श्वेता व ऐश्वर्या यांचे वाद असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. पण जामनगरहून मुंबईत आल्यावरचा या नणंद-वहिनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे.

बच्चन कुटुंबाचा विमानतळावरील एक व्हिडीओ रेडीटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आधी आराध्या व पाठोपाठ श्वेता अन् ऐश्वर्या येताना दिसतात. त्या दोघीही गप्पा मारताना या व्हिडीओत दिसत आहेत. अभिषेक गाडीच्या दरवाजाजवळ थांबलेला दिसतो. नंतर श्वेताचा मुलगा अगस्त्य येतो आणि ऐश्वर्या व आराध्या त्याला मिठी मारताना दिसतात. ऐश्वर्या व श्वेता पहिल्यांदाच गप्पा मारताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या.

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

दरम्यान, अमिताभ बच्चन व त्यांचे संपूर्ण शेवटच्या दिवशी अनंत अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये सहभागी झाले. १ ते ३ मार्चपर्यंत गुजरातमधील जामनगर इथं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या व आराध्या, श्वेता नंदा व अगस्त्य ३ मार्चला दुपारी जामनगरला गेले आणि रात्री ते मुंबईला परतले.

Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास जानेवारी २०२३ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं. आता जुलै २०२४ मध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचं लग्न मुंबईत थाटामाटात पार पडणार आहे.