आजही कित्येक तरुण कलाकारांना लाजवेल असा उत्साह असणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायम त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सिम्बायोसिस चित्रपट महोत्सवात नुकतीच बिग बी यांनी हजेरी लावली अन् चित्रपटक्षेत्रातील बऱ्याच गोष्टींबद्दल भाष्य केलं. चित्रपटक्षेत्रात तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे होणारे फायदे आणि तोटे याबद्दल बिग बी यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिम्बायोसिस युनिव्हार्सिटीमधील चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन बिग बी व त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्या हस्ते करण्यात आलं. यादरम्यान संवाद साधताना बिग बी म्हणाले, “बऱ्याचदा चित्रपटसृष्टीवर प्रचंड टीका होते. याबरोबरच चित्रपटांचं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं, तसेच लोकांची मानसिकता बदलण्यामागे चित्रपटसृष्टीच कशी जबाबदार आहे असे आरोप बऱ्याचदा केले जातात.”

आणखी वाचा : “आम्ही स्वतःला हिंदू…” गशमीर महाजनीने सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केली खंत

अमिताभ बच्चन यांचे वडीलदेखील त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कायम हिंदी चित्रपटच पहायचे ही आठवण बिग बी यांनी शेअर केली. बऱ्याचदा हरिवंशराय बच्चन हे आधी पाहिलेले चित्रपटच पुन्हा पहायचे. दरम्यान बिग बी यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांचं कौतुक केलं, पण हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट हे जास्त चांगले आहेत या बऱ्याच लोकांच्या मताशी बिग बी सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बिग बी म्हणाले, “प्रादेशिक चित्रपट चांगलाच व्यवसाय करत आहे. पण पाहायला गेलं तर ती लोकसुद्धा तेच चित्रपट करत आहेत जे आधी हिंदीत झाले आहेत. ते फक्त वेशभूषेमध्ये बदल करत आहेत ज्यामुळे ते आणखी वेगळे आणि सुंदर वाटत आहेत. मल्याळम आणि काही प्रमाणात तमिळ चित्रपट हे फार वेगळे आणि आशयघन विषयांची मांडणी करतात. परंतु असं एकाच चित्रपटसृष्टीकडे बोट दाखवून तक्रार करणं आणि त्यांचे चित्रपटच उत्कृष्ट आहेत असं म्हणणं योग्य नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan says saying regional films are better than hindi films is not right avn
First published on: 28-01-2024 at 09:50 IST