मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या नव्या भागात तिची बहीण अमृता अरोराने हजेरी लावली. यावेळी दोन्ही बहिणींचं बाँडिंग चाहत्यांना पाहायला मिळालं. तसेच अमृताने मलायकाला टोमणेही मारले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायकाने तिच्या स्टँड-अप सादरीकरणात आपल्याबद्दल केलेल्या विनोदांबद्दलही अमृताने प्रतिक्रिया दिली.

अमृता मलायकाला म्हणाली, “तू माझ्यावर विनोद करताना माझ्या भावनांचाही विचार करायला हवा होता. मी प्लस साईझचे कपडे घालण्यापासून ते मी काहीच काम करत नाही, हेही तू अप्रत्यक्षपणे बोलून गेलीस. तुझ्या डोक्यात जेव्हा माझ्यावरचे असे विनोद करायचा विचार आला तेव्हा तू मला फोन करून ते विनोद मला चालणार आहेत का, हे विचारायला हवं होतंस.” यावर उत्तर देत मलायका म्हणाली, “ते ठीक आहे, पण स्टँड-अपमध्ये असं केलं जात नाही.”

Rape Case
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

“तिच्याकडे श्रीमंत नवरा पण मी सुंदर असूनही…” भर कार्यक्रमात असं कोणाविषयी बोलली मलायका अरोरा?

तेव्हा अमृता म्हणाली, “तू असं अचानक कुणालाही धावत्या बसखाली फेकू शकत नाहीस ना. म्हणजे तू त्या दिवशी जे सादरीकरण केलंस ते उत्तम होतंच, पण मला असं वाटतं की आपण जेव्हा दुसऱ्याबद्दल अशा कार्यक्रमांमध्ये विनोद करतो, तेव्हा त्या संबंधित व्यक्तीला एकदा तरी विचारायला हवं. फक्त अम्मूलाच (मला) तू धावत्या बसखाली का फेकलंस?” असं अमृता म्हणाली. त्यावर “मला वाटतं की मी त्यादिवशी बऱ्याच जणांबद्दल बोलले होते,” असं मलायला म्हणाली.

काही दिवसांपूर्वी मलायकाचा स्टँड अप कॉमेडी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मलायका म्हणाली होती की, “बऱ्याचदा लोक माझ्या वयाबाबत प्रश्न निर्माण करतात की मी म्हातारी दिसू लागली आहे. खरं तर हे लोक माझ्यावर जळतात.” तसेच ती अमृताला उद्देशून म्हणाली होती, “ही माझी बहीण आहे आणि तिच्याकडे श्रीमंत नवरा आहे. पण मी इतकी सुंदर असूनही इथे उभी राहून स्टँडअप कॉमेडी करत आहे.” मलायकाचं हे बोलणं ऐकून अमृता त्यावेळी खूप हसली होती. पण नंतर मात्र बहिणीने केलेल्या कमेंट्स अमृताला रुचल्या नसल्याचं दिसतंय.