बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सुश्मिता मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचे निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात, अभिनयाबरोबर सुश्मिता तिच्या वैयक्तिक कारणामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. दरम्यान सुश्मिताचा रोहमन शॉलबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन दोघांमध्ये पॅचअप झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- तुळशीला पाणी घातल्यामुळे अमिताभ बच्चन झाले ट्रोल; पण का? घ्या जाणून

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

दरम्यान नुकतचं सुश्मिता आणि रोहमन दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत एकत्र दिसले. एकमेकांच्या हातात हात घालून दोघे पार्टीत येताना दिसले. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही ब्रेकअपनंतर अनेकदा सुश्मिता आणि रोहमन एकत्र दिसले होते.

यावेळी सुश्मिताने काळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत सुश्मिता खूपच सुंदर दिसत होती. रोहमनने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमाबरोबर हिरवा ब्लेझर घातला होता. सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहते खूश आहेत. दोघांच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत सुश्मिताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- रश्मिकानंतर कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल, ‘टायगर ३’ मधील टॉवेल सीन केला मॉर्फ

सुश्मिताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर नुकतीच तिची वेबसिरीज ‘आर्या’चा सीझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या दोन सीझनप्रमाणे या सीझनमध्येही सुश्मिताने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी तिचा ‘ताली’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती.