काही दिवसांपूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाला चित्रपटगृहात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर या चित्रपटाने खूप चांगली कमाई ही केली. आता या चित्रपटातील एक डिलीट केलेला सीन व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील आलिया आणि रणवीरची केमिस्ट्री सर्वांनाच खूप आवडली. त्या व्यतिरिक्त या चित्रपटातील सर्व कलाकारांची कामं, चित्रपटातील गाणी, संवाद या सगळ्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अशातच या चित्रपटातून कट केले गेलेला आलिया आणि रणवीरचा एक सीन समोर आला आहे.

आणखी वाचा : “सेटवर रणवीर-आलिया…”, क्षिती जोगने सांगितला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याचा अनुभव

व्हायरल होत असलेला हा डिलीटेड सीन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये होता. पण चित्रपटातून तो वगळला गेला. या चित्रपटाच्या वेळेची मर्यादा पाळण्यासाठी करण जोहरने हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. व्हायरल होत असलेला हासिम आलिया आणि रणवीरचा आहे. या सीनची सुरुवात रॉकीपासून वेगळ झाल्यानंतर मला पूर्वीसारखं व्हायला थोडा वेळ लागेल पण मी ती होईन असं रानी स्वतःशी म्हणते. इतक्यात रॉकी खिडकीतून येतो आणि मग त्या दोघांमध्ये संभाषण सुरू होतं.

हेही वाचा : “काही कलाकार इतके मोठे स्टार्सही नाहीत, पण…”, क्षिती जोगने सांगितला रणवीर सिंहबरोबर काम करण्याचा अनुभव

तर आता या व्हायरल होत असलेल्या सीनवर प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कमेंट करत लिहीलं की, “हा सीन चित्रपटामध्ये असायला हवा होता.” तरी याच बरोबर अनेक जण म्हणाले की, “हा सीन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सीन्सपैकी एक आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deleted scene of alia bhatt and ranveer singh from rocky aur rani ki prem kahani got viral rnv
First published on: 14-09-2023 at 17:19 IST