९० च्या काळापासून ते आतापर्यंत एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या काजोलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काजोलची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या नेहमी लक्षात असते. काजोलने बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलंय.

काजोल पुन्हा एकदा अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्याबरोबर चित्रपट करणार आहे. काजोलने तब्बल २७ वर्षांपूर्वी तमिळ चित्रपट ‘मिनसारा कनावु’मध्ये पहिल्यांदाच प्रभुदेवा यांच्याबरोबर काम केलं होतं. १९९७ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव मेनन यांनी केलं होतं; तर एम. सरवणन, एम. बालसुब्रमण्यम आणि एम. एस. गुहान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अरविंद स्वामी, प्रभुदेवा आणि काजोल प्रमुख भूमिकेत होते.

हेही वाचा… ब्रेकअपनंतर श्रुती हासनने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

अरविंद स्वामी, काजोल आणि प्रभुदेवा, यांनी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या, त्यांनी चित्रपटाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने लोकप्रिय फिल्मफेअर मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केलं होतं आणि तेव्हा ते मुखपृष्ठावर झळकले होते. मॅगझिनचं शूट १९९७ मध्ये झालं होतं. त्याकाळी हिंदी भाषिक लोकसंख्येमध्ये दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील एका चित्रपटासाठी अशा प्रकारची पब्लिसिटी करणे हे अतिशय असामान्य आणि वेगळे होते.

आता काजोल प्रभुदेवा यांच्याबरोबर ॲक्शन पॅक असा सिनेमा करणार आहे. तमिळ फिल्ममेकर चेरन या चित्रपटात दिग्दर्शन करत असल्याचं समोर आलंय. ‘जवान’ चित्रपटाचे सिनेमोटोग्राफर जी. के. विष्णू या चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग काही महिन्यांपूर्वीच सुरू झालं आहे. काजोल लवकरच मुंबईमध्ये या चित्रपटाच्या पुढील सीक्वेन्सच्या शूटिंगची सुरुवात करणार आहे.

हेही वाचा… RCBच्या सामन्यादरम्यान अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

काजोल आणि प्रभुदेवा अभिनीत हा चित्रपट अखिल भारतीय स्तरावरही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पार्श्वभूमी याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… राजकुमार रावने केला ‘गजगामिनी वॉक’; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, “मलायकासारखा…”

दरम्यान, काजोलच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं, तर ‘सरजमीन’, ‘दो पत्ती’ आणि ‘मॉं’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काजोल चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमध्येही झळकायला लागली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात काजोल शेवटची झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता.