अभिनेत्री श्रुती हासन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका यांनी ब्रेकअप केल्याचं वृत्त गेल्या महिन्यात समोर आलं होतं. चार वर्षांपासून एकत्र असलेल्या या कपलने काही कारणास्तव वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

श्रुती आणि शांतनू यांच्यात काही वैयक्तिक समस्या होत्या त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, असंदेखील म्हटलं जात होतं. आता या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच श्रुतीने मौन सोडलं आहे. श्रुतीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा… RCBच्या सामन्यादरम्यान अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एका कारमध्ये बसलेली दिसतेय. श्रुतीने या व्हिडीओत सफेद रंगाची डिझायनर साडी नेसली आहे असं दिसतंय. या व्हिडीओमध्ये श्रुतीने चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्यास सांगितले. ती ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याने तिने हा प्रश्न-उत्तराचा उपाय चाहत्यांना सुचवला. हा व्हिडीओ शेअर करताच सगळ्यांनी पटापट श्रुतीला प्रश्न पाठवण्यास सुरूवात केली.

हेही वाचा… राजकुमार रावने केला ‘गजगामिनी वॉक’; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, “मलायकासारखा…”

श्रुतीला विचारण्यात आलेला पहिलाच प्रश्न म्हणजे, ती सिंगल आहे की कमिटेड आहे. या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली, “मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजिबात आवडत नाही आहे पण मी पूर्णपणे सिंगल आहे आणि मिंगल व्हायला अजिबात तयार नाही, मी फक्त आता काम करते आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद घेत आहे.”

श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शांतनूबरोबरचे सगळे फोटो हटवले, ज्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं हे समोर आलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोदेखील केलं आहे. श्रुती आणि शांतनू एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहत होते. दोघं अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावायचे. शांतनू हा एक प्रसिद्ध डूडल आणि मल्टीडिस्पलनरी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. त्याने रफ्तार, डिवाईनसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींबरोबर काम केलंय.

हेही वाचा… VIDEO: “भावाचं ब्रेकअप झालं…”, पृथ्वीक प्रतापचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, श्रुतीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर श्रुती शेवटची ‘सालार’मध्ये झळकली होती. साउथ स्टार प्रभास अभिनीत ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता ती ‘सालार पार्ट २’च्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याची चर्चा आहे.