सध्या शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २४ कोटींपेक्षा अधिक कमाई केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे. आता ‘पठाण’ची हवा असताना कंगना रणौतने केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Video : शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील सलमान खानचा ‘तो’ सीन लीक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Munjya fame Abhay Verma had a chance to work with Shahrukh Khan's daughter, Suhana, in a film, but he rejected it
‘मुंज्या’ फेम अभय वर्माने नाकारला होता ‘हा’ चित्रपट, शाहरुख खानची लेक होती प्रमुख भूमिकेत; अभिनेता म्हणाला, “मी ऑडिशन दिलं आणि…”
marathi actress special connection with kalki 2898 AD movie
मराठमोळ्या अभिनेत्रीचं आहे ‘Kalki 2898 AD’ चित्रपटाशी खास कनेक्शन! कमल हासन यांचा उल्लेख करत म्हणाली…
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
first 100 crore bollywood movie
फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?
junaid khan maharaj review
Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा
Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता
Sangharshyoddha movie box office collection
‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाने सातव्या दिवशी कमावले फक्त ३ लाख, एकूण कलेक्शन किती? वाचा
Yere Yere Paisa 3 movie release on the occasion of diwali
Video : ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार, दिग्दर्शकासह एकत्र केला डान्स! चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

कंगना प्रत्येक विषयावर तिचं मत अगदी स्पष्टपणे मांडते. आता तिने ट्विटरवर पुन्हा पुनरागमन केलं आहे. मध्यंतरी एका ट्विटमुळे तिला ट्विटरला रामराम करावा लागला होता. पण आता पुन्हा ट्विटरवर परतल्यानंतर तिने बॉलिवूडला उद्देशून केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.

काय म्हणाली कंगना रणौत?

“चित्रपटसृष्टी इतकी मुर्ख आहे की, कोणताही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती रुपये कमावले हे दाखवलं जातं. कलेचा दुसरा काहीच हेतू नाही असं भासवलं जातं. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हे यामधून दिसून येतं.”

पुढे कंगना म्हणाली, “कलेचा जन्म मंदिरांमधून झाला आहे. त्यानंतर ही कला चित्रपटगृहांपर्यंत पोहोचली. चित्रपटसृष्टी फक्त व्यवसाय करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली नाही. फक्त कोटींमध्ये कमाई करण्यासाठी चित्रपटसृष्टी नाही. म्हणून नेहमीच कलेचा आदर केला जातो कोणत्याही व्यवसायाचा नाही.” मात्र कंगनाने हे ट्वीट करत असताना कुठेही ‘पठाण’ चित्रपटाचा उल्लेख केलेला नाही.