Premium

‘रॉकी और रानी…’ सिनेमातील ‘रंधावा पॅराडाईज’ मध्ये एकाचा खून, भर लग्नात गोळ्या झाडून संपवलं

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात रणवीर सिंहचं घर असलेल्या आलिशान बंगल्यात घडली दुर्दैवी घटना

murder at randhawa paradise noida
नोएडामधील या बंगल्यात झाला एकाचा खून (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट्स)

करण जोहरचा सुपरहिट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील रॉकी रंधावाचा आलिशान बंगाला तुम्हाला आठवत असेल. आता याच बंगल्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी रात्री ग्रेटर नोएडा वेस्टमधील या फार्महाऊसमध्ये एका ५५ वर्षीय पुरुषाला त्याच्या मुलाच्या सासऱ्याने गोळ्या घालून ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटात दाखवण्यात आलेला ‘रंधावा पॅराडाईज’ नावाचा हा बंगला सेक्टर ग्रेटर नोएडा येथील सेक्टर १, नोएडा एक्स्टेंशन याठिकाणी आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल नोएडाच्या पोलीस उपायुक्त सुनीती यांनी मृताचे नाव व माहिती दिली आहे. मृताचे नाव अशोक यादव असून ते सेक्टर ५१, नोएडा येथील रहिवासी होते. तसेच ते सेक्टर ५१ ब्लॉक एच येथील वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष होते.

रंधावा पॅराडाइज म्हणून प्रसिद्ध झालेला बंगला (फोटो – स्क्रीनशॉट)

“ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौर मलबेरी फार्महाऊसमध्ये सोमवारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि तिथेच गाझियाबादमधील शेखरने रात्री साडेनऊच्या सुमारास अशोक यांची गोळ्या झाडून हत्या केली. अशोक यांचा मुलगा आणि शेखरची मुलगी या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडण झाले होते,” अशी माहिती सुनीती यांनी दिली.

“मी त्याला दिलीप नावाने…”, सुरेश वाडकरांचे एआर रहमान यांच्याबद्दल विधान, ‘त्या’ वादानंतर दोघांनी कधीच एकत्र केलं नाही काम

“आमच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, शेखर आणि अशोक यांच्यात भांडण झाले आणि त्यानंतर शेखरने अशोक यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला आणि शेखर पळून जाण्यात यशस्वी झाला. शेखरने हल्ल्यासाठी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर वापरली आहे,” असं सुनीती म्हणाल्या.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

दरम्यान, आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. रणवीरने रॉकी रंधावाची भूमिका साकारली होती, तर रानीच्या भूमिकेत आलिया भट्ट होती. याशिवाय चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन, क्षिती जोग, अंजली आनंद अशा कलाकारांची मांदियाळी होती. २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man shot dead at randhawa paradise noida from rocky aur rani kii prem kahaani movie hrc

First published on: 29-11-2023 at 12:54 IST
Next Story
‘टायगर ३’मधील कतरिनाच्या ‘त्या’ टॉवेल फाइट सीनवर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला “माझी बिलकूल इच्छा नाही की..”