२८ एप्रिलला केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मराठी माणसाने या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. याच दिवशी या चित्रपटाबरोबर एका बॉलिवूड स्टारच्या मुलाचा चित्रपटही प्रदर्शित झाला. मिथुन चक्रवर्ती यांचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्तीने नुकतंच बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केलं आहे. नमाशीचा ‘बॅड बॉय’ हा चित्रपटही २८ तारखेला प्रदर्शित झाला.

२००८ साली मिथुन यांच्या मोठ्या मुलानेही ‘जीम्मी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट सपशेल आपटला होता. हीच अवस्था नमाशीच्या ‘बॅड बॉय’ची झाली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने घोर निराशा केली आहे.

Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
govinda net worth
चित्रपटांपासून दूर तरीही ऐशोआरामात जगतो गोविंदा, कसे कमावतो कोट्यवधी रुपये, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
Cannes International Film Festival All We Imagine As Light movie
आनंददायी कानपर्व
itendra Awhad
“महिला मुलं जन्माला घालणाऱ्या मशीन्स नाहीत”, ‘त्या’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार
cannes 2024 payal kapadia makes history with cannes grand prix win
Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक
_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?

आणखी वाचा : महिन्याभरातच प्रियदर्शन यांचा ‘Corona Papers’ ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ १० लाखांचा गल्ला जमवला आहे, तर पुढे आलेला शनिवार रविवार मिळून या चित्रपटाने एकूण ३७ लाखांची कमाई केली आहे. एकूणच हा एक बॉक्स ऑफिस डिझास्टर असा चित्रपट ठरला आहे. यापुढेही हा चित्रपट फारशी कमाई करणार नाही अशी शक्यता ट्रेड एक्स्पर्टकडून वर्तवण्यात आली आहे.

खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनीही यात छोटा कॅमिओ केला आहे तरी मुलाचा पहिला चित्रपट फ्लॉप होण्यापासून ते वाचवू शकलेले नाहीत. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात नमाशीसह जॉनी लिवर, राजपाल यादव, दर्शन जरीवाला हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.