Premium

‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान रेखा यांच्या ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ चर्चेत

रेखा व्यतिरिक्त कतरिना कैफ, विकी कौशलचे आई-वडील यांनीही या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली

rekha-sam-bahadur
फोटो : सोशल मीडिया

बुधवारी रात्री विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला अनेक बॉलिवूड कलाकारांनी व सेलिब्रिटीजनि हजेरी लावली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे आणि विकी कौशल पडद्यावर त्यांचे हे पात्र साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक मोठमोठे कलाकार हजर होते. दरम्यान बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनीही या स्क्रीनिंगला हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतकंच नव्हे रेखा यांनी कॅमेऱ्यासमोर जी कृती केली त्यामुळे त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीच मनं जिंकली. ‘साम बहादूर’च्या खास स्क्रिनिंगमध्ये रेखा काळ्या कांजीवरम साडीत फार उत्तम दिसत होत्या. सेलिब्रिटीजच्या या मांदियाळीत रेखा यांची उपस्थिती आकर्षण वाढवणारी होती. रेड कार्पेटवर रेखा यांना पाहून मीडियातील मंडळीही खुश झाली.

आणखी वाचा : “त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा

कॅमेऱ्यासमोर येताच रेखा या चित्रपटाच्या पोस्टरकडे वळल्या अन् जिथे विकी कौशल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसत आहे तिथे रेखा यांनी आपले दोन्ही हात जोडून पोस्टरकडे वाकून प्रणाम केला. रेखा यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. रेखा यांचे सॅम माणेकशा यांच्या प्रतिमेला वाकून वंदन करणे हे लोकांना पसंत पडले आहे. कित्येकांनी कॉमेंट करत रेखा या खऱ्या देशभक्त आहेत असंही म्हंटलं आहे.

रेखा व्यतिरिक्त कतरिना कैफ, विकी कौशलचे आई-वडील यांनीही या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली, जे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. कॅमेऱ्यासमोर विकी कौशल त्याचे वडील शाम कौशल यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसला आणि त्याच्या या कृतीने लोकांची मनं जिंकली. ‘सॅम बहादुर’ चित्रपटात विकीसह सान्या मल्होत्रा ​​देखील आहे. या चित्रपटात सान्याने सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेख भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rekha at vicky kaushals upcoming sam bahadur special screening avn

First published on: 30-11-2023 at 09:03 IST
Next Story
रणदीप हुड्डाची बायको लिन लैशराम कोण आहे? कशी आहे या दोघांची लव्हस्टोरी?