ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नकारात्मक भूमिका साकारून चित्रपटांमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. उत्तम अभिनयाने त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. पण प्रेक्षकांमध्ये त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक ‘हिरो’ असुरक्षित झाले होते, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी नकारात्मक भूमिका सोडून हिरोच्या भूमिका करायचं ठरवलं, असा खुलासा त्यांनी केला.

‘झूम’शी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की त्यांची सेक्रेटरी आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा या त्यांनी खलनायकाच्या भूमिका सोडून देण्याच्या विरोधात होत्या. “फक्त माझी सेक्रेटरीच नाही तर माझी बायकोही म्हणायची, ‘तू का सोडतोयस? खलनायकांची खूप क्रेझ आहे.’ पण आता ते सोडायची वेळ आली आहे हे मी त्यांना कसं समजावलं असतं? लोक मला पाठिंबा देत होते, ते माझ्यासाठी टाळ्या वाजवून मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देत होते,” असं सिन्हा म्हणाले.

nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया
ulta chashma
उलटा चष्मा: ‘टीआर’ बांधवांची विनंती..

केसाच्या तेलाची जाहिरात करतेस, मग पतीच्या डोक्याला का लावलं नाही? जुही चावला म्हणाली, “त्यांचे हाल…”

शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या निर्णयांमागील मोठे कारणही सांगितले. “सर्व मोठे हिरो माझ्याबरोबर काम न करण्याचं निमित्त शोधत होते. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना होती. ते म्हणायचे, ‘हा सीनमध्ये भाव खाऊन जातो आणि पडद्यावर वर्चस्व गाजवतो. तुम्हाला हिरो हवा आहे की खलनायकाचं वर्चस्व असलेला हिरो हवाय?’ असं ते म्हणायचे. ते माझ्या तोंडावर बोलण्याचं धाडस करत नव्हते, पण माझ्या पाठीमागे माझ्याविरुद्ध बोलायचे,” असं सिन्हा म्हणाले.

“तो माझ्या घरी आला अन्…”, जुही चावलाला आमिर खानने दिलेलं सर्वात स्वस्त गिफ्ट; म्हणाली, “घरातील सर्वजण…”

हिंदी चित्रपटसृष्टीतील सक्रिय असताना शत्रुघ्न सिन्हा चित्रपटाच्या सेटवर उशीरा येतात असं म्हटलं जायचं. याबद्दल ते म्हणाले, “ते (हिरो) म्हणायचे, ‘तो उशीरा येतो’. अरे मी उशीरा येत असलो तरी तुमच्या बापाचं काय जातंय? जे काम तुम्ही १० तासांत पूर्ण करता, ते काम मी दोन-तीन तासांत पूर्ण करतो, असं सगळेजण माझं कौतुक करतात. मी ‘वन-टेक’ कलाकार होतो. लोक म्हणायचे की मी १० पानांचे डायलॉग फक्त एक-दोन वेळा वाचतो आणि डायरेक्ट टेक करतो. ते माझ्या कामामुळे खूश असायचे.”

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

“एक काळ असा होता की इंडस्ट्रीतील लोक दुसऱ्याचा चित्रपट फ्लॉप झाला की आनंद साजरा करत असत. एखाद्याचा चित्रपट फ्लॉप झाल्यास ते शॅम्पेन उघडायचे. आपण या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत हे ते विसरायचे. हिट आणि फ्लॉप हा इथल्या जीवनाचा एक भाग आहे. लोक त्यांच्या यशावर नव्हे तर इतरांच्या अपयशावर पार्टी करायचे,” असं त्यांनी सांगितलं. एकेकाळी मीही अशा सेलिब्रेशनचा भाग होतो पण आता मी त्याचा भाग होऊ शकत नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.