scorecardresearch

लग्न सिद्धार्थ-कियाराचं, चर्चा मात्र ईशा अंबानीच्या बॅगेची; किंमत ऐकून थक्क व्हाल!

ईशा अंबानीच्या बॅगेची किंमत ऐकून थक्क व्हाल!

isha ambani bag price
ईशा अंबानीच्या बॅगेची किंमत ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या तयारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या दोघांच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे. कियारा अडवाणीची खास मैत्रीण असलेली ईशा अंबानीही या लग्नात सहभागी होणार आहे. काही दिवसांपूर्वी ईशा अंबानीचा विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला होता. यात त्यांच्या हातातल्या बॅगेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार असून त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस ते दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. याच पार्श्भूमीवर करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार हे जैसलमेरला पोहोचले. विशेष म्हणजे कियारा अडवाणीची खास मैत्रीण असलेली ईशा अंबानी या लग्नात सहभागी झाली आहे. ईशा आणि कियारा या दोघीही एकमेकींच्या बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. त्या दोघांमध्ये खूप स्पेशल बॉण्डिंग आहे.
आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती? 

काही दिवसांपूर्वी ईशा अंबानी ही कियाराच्या लग्नासाठी पतीबरोबर जैसलमेरला पोहोचली. तिचे विमानतळावरील लूकचे अनेक फोटो ही व्हायरल झाले होते. यावेळी इशाने पांढऱ्या रंगाचा डिझाईनर ड्रेस परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात डायमंड ज्वेलरीही परिधान केली होती. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.

या लूकबरोबर ईशाने हातात घेतलेल्या गुलाबी रंगाच्या बॅगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिची ही बॅग फारच लहान असली तरी तिची किंमत ऐकून सर्वजण थक्क झाले. ईशाच्या हातात असलेली ही हँडबॅग ‘हर्मीस पॅरिस’ या लक्झरी ब्रँडची आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातलेला ‘कार्टियर पँथर ब्रोच’ कोणी दिला? ‘त्या’ व्यक्तीचं नाव आलं समोर

isha ambani bag
ईशा अंबानी बॅग

ही बॅग गुलाबी एप्सम लेदरपासून तयार करण्यात आली आहे. ‘केली २० मिनी सेलर बॅग’ असे या बॅगेचे नाव आहे. या बॅगेची किंमत ३८ हजार ५५० अमेरिकन डॉलर इतकी आहे. याचाच अर्थ भारतीय चलनानुसार या बॅगेची किंमत ३१ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. ईशा अंबानीच्या या बॅगेची किंमत ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:12 IST