२७ ऑक्टोबर रोजी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये कंगना रणौतचा ‘तेजस’, विक्रांत मेस्सीचा ’12th Fail’, नितीन गडकरींच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ या चित्रपटांचा समावेश आहे. कंगना रणौतचा तेजस बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकलेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. या चित्रपटाला कमी बजेट असलेल्या ’12th Fail’ या सिनेमाने टक्कर देत चांगली कमाई केली आहे.

कंगना रणौतच्या ‘तेजस’ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

’12th Fail’ या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. यात आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षाची कहाणी आहे, जे ९वी, १० वी मध्ये थर्ड क्लास आणि १२ वी मध्ये नापास झाल्यानंतर कठोर परिश्रम करून IPS झाले. हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.

“समोरचा कितीही माजलेला असला तरी…”, मराठा आरक्षणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “अशा आंदोलनांचा इतिहास…”

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ’12th Fail’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विक्रांतने शेअर केलेल्या पोस्टनुसार, चित्रपटाने १.१ कोटी रुपये कमावले आहेत. तर, दुसरीकडे तेजसनेही इतकीच कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट व बजेट बघता ’12th Fail’ हा कंगनाच्या तेजसवर भारी पडला आहे. ’12th Fail’ चित्रपटाचं बजेट अवघे ३० कोटी रुपये आहे, तर कंगनाच्या चित्रपटासाठी ४५ कोटींहून जास्त खर्च करण्यात आला आहे.

दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी जवळपास सारखीच कमाई केली आहे. त्यामुळे आता दोन्हीच्या वीकेंड कलेक्शननंतरच चित्रपट चांगली कमाई करेल की बॉक्स ऑफिसवरून गाशा गुंडाळेल हे कळेल. सध्या तरी प्रेक्षकांमध्ये विक्रांत मेस्सीच्या ’12th Fail’ चित्रपटाची कंगना रणौतच्या ‘तेजस’पेक्षा जास्त चर्चा आहे.