कंगना रणौत ही तिच्या लाजवाब अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटीजम आणि माफियाबद्दल उघडपणे भाष्य करायला सुरुवात केली. याबरोबरच कंगना तिची राजकीय मतंदेखील परखडपणे मांडत असते. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांबद्दलही कंगना भाष्य करताना आढळते. कंगना सध्या तापसी पन्नू व स्वरा भास्करबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगना या दोन्ही अभिनेत्रींना 'बी ग्रेड' अभिनेत्री म्हंटलं होतं. नुकतंच तिने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. कंगना सध्या 'तेजस' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान 'टाइम्स नाऊ नवभारत'शी संवाद साधताना कंगनाने यावर भाष्य केलं आहे. आणखी वाचा : 'राम-लीला'मधील 'त्या' किसिंग सीनबद्दल रणवीर-दीपिकाचा मोठा खुलासा; 'कॉफी विथ करण'च्या सेटवर सांगितला किस्सा कंगनाने तापसी व स्वराच्या बाबतीत असं भाष्य का केलं याबद्दल बोलताना ती म्हणाली, "तापसी एकदा म्हणालेली की मला मुखवट्यांची गरज आहे, त्यावेळी तीच स्वतः प्रचंड स्ट्रगल करत होती. २०१६ मध्ये तिला प्रथम यश मिळालं. त्यावेळी तिने माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं होतं अन् त्यावर माझ्या बहिणीने तिला उत्तर दिलं होतं की तापसी ही कायम कंगनाला कॉपी करते, तिने नाकारलेले चित्रपटच तापसी करते." कंगना पुढे म्हणाली, "आज त्या दोघींचं करिअर खरंतर माझ्यामुळेच सुरू आहे आणि यश मिळालं आहे, त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल वक्तव्य करायला नको होतो. माझ्या बहिणीने त्यांना उत्तर दिलं खरं पण मी मात्र त्यांना फारशी किंमत दिली नाही, त्यांना मिळालेलं यश पाहून मी खुश आहे." कंगनाचा आगामी चित्रपट 'तेजस' २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.