नुकताच अभिनेत्री तापसी पन्नूचा 'थप्पड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरागुती हिंसाचार तसेच पूर्वापारपासून चालत आलेल्या मानसिकता मांडण्याचा प्रयत्न 'थप्पड' चित्रपटात करण्यात आला आहे. तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'थप्पड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०७ कोटी, दुसऱ्या दिवशी ५.०५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६.५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकून तीन दिवसांमध्ये चित्रपटाने १४.६६ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. #Thappad has decent weekend. #Delhi, #NCR, #Mumbai contribute, compensate for the non-performance beyond metros. Healthy growth on Day 3 is a plus. Important to put up respectable numbers on weekdays. Fri 3.07 cr, Sat 5.05 cr, Sun 6.54 cr. Total: ₹ 14.66 cr. #India biz. — taran adarsh (@taran_adarsh) March 2, 2020 ‘थप्पड’ या चित्रपटात फक्त एका पुरुषाने स्त्रिला कानाखाली मारल्याची कथा दाखवण्यात आली नसून स्त्रियांच्याही मानसिकतेला चपराक लगावणारी आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, तन्वी आज़मी, दिया मिर्झा आणि राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.