अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया या काळात सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. मध्यंतरी काही काळ या चर्चेला विराम मिळाला होता. पण आता पुन्हा तिच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेचं कारणही तसंच आहे. बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय शो 'बिग बॉस' च्या आगामी १५ व्या सीजनमध्ये रिया चक्रवर्ती दिसणार याबाबत सध्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूय. त्यामुळे टीव्ही शोमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती स्क्रीनवर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. बॉलिवूडचा 'दंबग' अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चं प्रसारण असो किंवा नसो, हा शो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. एकीकडे केप टाउनमध्ये गाजावाजा करत 'खतरों के खिलाडी 11' ची शूटिंग सुरू आहे, तर दुसरीकडे 'बिग बॉस'च्या १५ व्या सीजनसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या शोच्या मेकर्सनी 'बिग बॉस १५' च्या स्पर्धकांची यादी काढण्याचं काम सुरू केलंय. यंदाच्या सीजनसाठी 'बालिका वधु' फेम नेहा मर्दा हिच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब करण्यात आलाय. शोच्या मेकर्सनी नेहाला 'बिग बॉस १५' साठी ऑफर दिली आहे आणि यावर विचार सुरू असल्याचं देखील नेहाने सांगितलं आहे. View this post on Instagram A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) नेहा पाठोपाठ शोच्या मेकर्सच्या रिया चक्रवर्तीकडे देखील प्रस्ताव दिला आहे. रिया चक्रवर्ती गेल्या एक वर्षापासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या अनेक वादामध्ये अडकताना दिसून आली. तिला ड्रग्स प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. रिया जवळजवळ १ महिना कारागृहात राहिली होती. 'बिग बॉस १५' मधून ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अडकल्यानंतर तिची बाजू लोकांसमोर मांडणार आहे, असं देखील बोललं जातंय. तिच्यावर लावलेल्या आलेल्या आरोपांवर ती मनमोकळ्यापणाने स्पष्टीकरण देताना दिसून येणार, असं देखील कळतंय. त्यामूळे या शोमधून स्वतःची इमेज चांगली करण्यासाठी रिया पुरेपुर प्रयत्न करणार आहे. 'बिग बॉस' शोची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. 'बिग बॉस १५' मध्ये मागच्या सीजनमधील काही विजेते देखील झळकणार आहे, असं बोललं जातं. या यादीमध्ये रूबिना दिलैक आणि रनर अप राहूल वैद्य यांची नावं आहेत. 'बिग बॉस' शो हा नेहमीच कॉन्ट्रोवर्शिअल ठरतो. गेल्या दोन वर्षापासून जे कलाकार लाइमलाइटपासून दूर राहिले आहेत, अशा कलाकारांना नव्या सीजनमध्ये घेणार आहे.