अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर हे नाव आता मराठी कलाविश्वाला नवीन राहिलेलं नाही. 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच तिच्या प्रत्येक लूकची, फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. त्यातच सध्या अपूर्वाच्या चाहत्यांमध्ये तिच्या लहानपणीच्या फोटोची चर्चा होताना दिसत आहे. अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून अनेक वेळा ती इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत असते. या फोटोंजमध्ये तिने तिच्या लहानपणीचे काही फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत आहे. विशेष म्हणजे आरस्पानी सौंदर्य लाभलेली अपूर्वा ही लहानपणी प्रचंड गोड आणि तितकीच चुणचुणीत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं. View this post on Instagram Woh bachpan ke din !!! #apurvanemlekar #nostalgic #hazeleyes A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on Apr 24, 2019 at 9:22pm PDT View this post on Instagram I wish you were here to tell me that everything's gonna be okay. I miss u paa like anything. A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on Oct 11, 2018 at 7:41am PDT View this post on Instagram My mom my everything ..#happymothersday #apurvanemlekar A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on May 12, 2019 at 1:13am PDT दरम्यान, अपूर्वाने 'आभास हा' या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेनंतर 'आराधना', 'एकापेक्षा एक','तू माझा सांगाती' या मालिकांमध्ये काम केलं. तसंच तिने 'चोरीचा मामला', 'आलाय मोठा शहाणा' या नाटकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती काही जाहिरांतींमध्येही झळकली आहे.