scorecardresearch

‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…

अभिनेत्री प्रिया बापटने यामागचे कारण सांगितले आहे.

Dada Ek Good News Aahe drama
'दादा एक गुड न्यूज आहे' नाटकाचे प्रयोग अचानक रद्द

मराठी रंगभूमीवर अनेक नाट्य रसिकांच्या पसंतीस पडलेले नाटक म्हणजे दादा एक गुडन्यूज आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे अनेक प्रयोग हे हाऊसफुल झाले होते. मात्र आता प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे आगामी प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने यामागचे कारण सांगितले आहे.

प्रिया बापटने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि उमेश एकत्र पाहायला मिळत आहे. यावेळी प्रियाने येत्या आठवड्यात ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल तिने चाहत्यांची माफीही मागितली आहे.
आणखी वाचा : “… म्हणून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने स्पष्ट केलं कारण

प्रिया बापट काय म्हणाली?

“गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे उमेशचा आवाज पूर्णपणे बसला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला काहीही बोलण्यास सक्त मनाई केली आहे. अचानक उद्भवलेल्या या कारणाने आम्हाला उद्या आणि परवाचे ‘दादा एक गुडन्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. आम्ही दोघंही त्याबद्दल तुमची माफी मागतो.

ज्यांनी या नाटकासाठी आगाऊ बुकींग केलं आहे, त्यांचे पैसे रिफंड केले जातील. यानंतर येणाऱ्या आठवड्यातील विकेंडचे प्रयोग मात्र नक्कीच होतील. कारण हा आठवडा उमेश आराम करेल आणि पुढच्या आठवड्यात तो नक्कीच बरा होईल. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि मला विश्वास आहे की तु्म्ही सर्वजण हे समजून घ्याल”, असे प्रिया बापटने यावेळी सांगितले आहे.

आणखी वाचा : Video : लहानपणी ‘अशी’ दिसायची प्रियदर्शनी इंदलकर, १५ वर्षांपूर्वीचा कॉमेडी शोमधील ‘तो’ व्हिडीओ समोर

दरम्यान ‘दादा एक गुडन्यूज’ आहे या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शिन केले आहे. तर नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:03 IST

संबंधित बातम्या