प्रत्येक सिनेमाप्रेमी व्यक्तीच्या मनात घर करून बसलेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाला आता आणखी एक सन्मान मिळालाय. हा सिनेमा गेल्या १०० वर्षांतील रसिकांचा सर्वांत आवडता चित्रपट म्हणून निवडला गेलाय. इंग्लंडमध्ये भारतीय चित्रपटांचे स्ट्रिमिंग करणारी अग्रगण्य सॅनोना कंपनीने घेतलेल्या जनमत चाचणीतून हा चित्रपट निवडला गेला.
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या बहारदार अभिनयामुळे देश-विदेशातील रसिक या सिनेमाच्या प्रेमात पडले होते. सॅनोना कंपनीने घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीमध्ये सुमारे ४७ टक्के रसिकांनी या चित्रपटाला पसंती दिली. फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्ससह मेलच्या माध्यमातूनही रसिकांकडून त्यांचे मत जाणून घेण्यात आले.
मतचाचणीमध्ये या चित्रपटाने आवारा, मदर इंडिया, शोले या गाजलेल्या चित्रपटांना मागे टाकले. प्रख्यात निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा याने या सिनेमाची कथा लिहिली होती आणि दिग्दर्शन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2013 रोजी प्रकाशित
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रसिकांचा सर्वाधिक आवडता सिनेमा!
प्रत्येक सिनेमाप्रेमी व्यक्तीच्या मनात घर करून बसलेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाला आता आणखी एक सन्मान मिळालाय.
First published on: 09-05-2013 at 03:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ddlj voted favourite indian film of the past 100 years