छोट्या पडद्यावरील सुपरस्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहियाच्या जोडीने ‘नच बलिये 8’चा किताब मिळवला आहे. स्टार प्लस वाहिनीवरील नृत्यावर आधारित ‘नच बलिये’च्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने पटकावले आहे. अंतिम सामना तीन जोड्यांमध्ये होता. सनाया इरानी- मोहित सहगल आणि सनल-अबीगेल यांना दिव्यांका आणि विवेकने हरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्यांका आणि विवेकला चाहत्यांनी भरभरून मतं दिल्याबद्दल दोघांनीही चाहत्यांचे आभार मानले आहेत. दोघांची जोडी बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध असल्याने ‘नच बलिये 8’चा किताब त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. याच प्रसिद्धीचा फायदा दोघांना झाला. ट्रॉफीसोबतच रोख इनामदेखील त्यांना मिळाला आहे. ‘नच बलिये’च्या या पर्वात दुसऱ्या क्रमांकावर सनाया आणि मोहितची जोडी तर अबीगेल आणि सनमच्या जोडीने तिसरे स्थान पटकावले.

VIDEO : दिव्यांकाच्या पाठवणीचा हा व्हिडिओ पाहिलात का?

‘नच बलिये ८’चा किताब आपल्या नावावर करण्यासाठी दिव्यांकाने स्टार प्लसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय अशी चर्चा गेल्या काही दिवसांत होती. एका ऑनलाईन ट्रोलने दिव्यांकाला टॅग करत ट्विटरवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘दिव्यांकाने स्टार प्लसला धमकी दिली आहे. जर नच बलियेमध्ये तिला विजेती न केल्यास ती स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका यह है मोहब्बते सोडून देईल.’ या ऑनलाइन ट्रोलला दिव्यांकानेही सडेतोड उत्तर दिलं होतं. याशिवाय दिव्यांका आणि सनाया इरानीच्या चाहत्यांमध्ये मध्यंतरी ऑनलाइन युद्ध होते. सोशल मीडियावर दोघींचे चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी भिडले होते. मात्र आपल्या आवडत्या जोडीला सर्वाधिक मतं देत प्रेक्षकांनी दिव्यांका आणि विवेकला ‘नच बलिये 8’चे विजेते बनवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divyanka tripathi and vivek dahiya won nach baliye
First published on: 25-06-2017 at 20:36 IST