scorecardresearch

Premium

“गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार…” व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी मराठमोळ्या इन्स्टा स्टारच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

या प्रकरणानंतर सोनालीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली होती.

sonalee gurav
सोनाली गुरव

सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता सोनालीने पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

Nilesh Sabale will exit from Zee Marathi Popular Show Chala Hawa Yeu Dya
‘चला हवा येऊ द्या’ची महत्त्वाची धुरा सांभाळणारा अभिनेता सोडणार कार्यक्रम, कारण सांगत म्हणाला…
Jaya Ekadashi 2024
Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला ‘या’ चार राशींना होणार बक्कळ धनलाभ? तुमचे नशीब पालटणार का? जाणून घ्या
Hindu New Year 2024
३० वर्षांनी गुढीपाडव्याला ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? नववर्षात शनिदेव देऊ शकतात अपार श्रीमंती
sonalee gurav feature
“ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सोनाली गुरवचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५००, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६५,६६ सी, ६७ ए या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

या प्रकरणानंतर सोनालीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना जाब विचारला आहे. तसेच तिने या संपूर्ण प्रकरणावर संतापही व्यक्त केला आहे. या पोस्टनंतर तिला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल तिने आभार मानले आहेत.

“तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम… काय बोलू मी… गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार, इतर सगळ्याचं गोष्टी मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करेन”, असे सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे म्हटले आहे.

सोनाली गुरव पोस्ट

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान सोनालीने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सोनालीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Famous instagram reel star sonalee gurav thanks post for supporter after filed police morphing viral video nrp

First published on: 05-04-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×