चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने वयाच्या ४३व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला होता. तिने आता त्यावर सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे आणि तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

नुकतीच फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक लेटर लिहिले आहे. ‘एक मुलगी, पत्नी आणि आई या नात्याने मला माझे निर्णय घ्यायचे होते. मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांमुळे आज एक लोकप्रिय कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती आहे. जेव्हा जेव्हा मला वाटले की मी योग्य आहे तेव्हा तेव्हा मी माझ्या मनाचे ऐकले आणि त्या गोष्टीवर निर्णय घेतला. आपण लोकं काय विचार करतील याकडे जास्त लक्ष देतो. पण त्यावेळी आपण विसरतो की आपल्या आयुष्याशी संबंधीत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आपल्याला आहे’ असे फराहने लेटरमध्ये म्हटले आहे.

man killed his one-day-old baby due to having doubts on wifes character
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या
anti trafficking cells busted sex racket in pune
पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी

पुढे तिने, ‘आज मी माझ्या निर्णयामुळे तीन मुलांची आई आहे. मी तेव्हाच आई होण्याचा निर्णय घेतला जेव्हा मी या गोष्टीसाठी तयार होते’ असे फराहने म्हटले आहे. फराह खानला अन्या, कजार आणि डीवा अशी तीन मुले आहेत. तिघेही आता १२ वर्षांची झाले आहेत.