संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षिती ‘हीरामंडी’ या सीरिजची खूप चर्चा आहे. ही सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच यातील एका अभिनेत्याची व त्याच्या अभिनयाची खूप चर्चा होताना दिसत आहे. या अभिनेत्याने सीरिजपूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केलंय व मॉडेलिंग देखील केलं आहे. पण त्याला खरी ओळख ओटीटीमुळे मिळाली.

अबुधाबीचा आहे अभिनेता

आपण ‘हीरामंडी’ सीरिजमधील ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे ताहा शाह बदुशा. ताहाने अनेक वर्षे इंडस्ट्रीत संघर्ष केला आणि त्यानंतर आज त्याला ही ओळख मिळाली आहे. ताहा शाह हा मुळचा अबुधाबीचा आहे. त्यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. ताहाने शालेय शिक्षणानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्रोग्रामसाठी प्रवेश घेतला होता, पण एका सेमिस्टरनंतर त्याने शिक्षण सोडलं. त्याला अभिनयाची आवड होती, त्यासाठी तो आई-वडिलांची परवानगी घ्यायला त्यांची मनधरणी करत होता. यादरम्यान त्याने अनेक व्यवसायही केले आणि मग त्याने मॉडेलिंग सुरू केले.

Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
when Tanvi Azmi married Baba Azmi
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos

श्रद्धा कपूरबरोबर पहिला चित्रपट, नंतर कतरिनासह केलं काम

मॉडेलिंग करत असताना ताहा मुंबईत शिफ्ट झाला. त्याने मायानगरीत आल्यावर अभिनय शाळेत प्रवेश घेतला. मुंबईत आल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांतच त्याला त्याचा पहिला चित्रपट ‘लव्ह का द एंड’ ची ऑफर मिळाली. या चित्रपटात त्याने श्रद्धा कपूरसोबत काम केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. यानंतर ताहाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण त्याला पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. ताहाने कतरिना कैफसह ‘बार बार देखो’ मध्येही काम केलं होतं, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नव्हता. अशा रितीने त्याचे श्रद्धा व कतरिनाबरोबरचे सिनेमे फ्लॉप ठरले.

हेही वाचा – कंगना रणौतने प्रचारसभेत अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना; नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले, “हिचा शेवटचा…”

ओटीटीने मिळवून दिली ओळख

चित्रपट केले, पण फारसं यश न मिळाल्याने ताहाने ओटीटीवर पदार्पण केलं. त्याने एकता कपूरच्या ‘बेकाबू २’ मध्ये काम केले होते. त्यानंतर तो ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’मध्ये झळकला होता. यामध्ये त्याने मुराद नावाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. आता ताहा संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’मध्ये ताजदार बलोचच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून ताहाच्या सोशल मीडिया फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अभिनेता इंटरनेट क्रश झाला आहे.