बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या बहुचर्चित ‘सुलतान’ चित्रपटाचा फर्स्टलूक जाहीर झाला आहे. खुद्द सलमानेच सोशल मीडियावर ‘सुलतान’ चित्रपटाचे छायाचित्र शेअर केले आहे. सुलतान चित्रपटात सलमान कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठी सुरू असलेल्या सराव शिबीरादरम्यान सलमानचे हे छायाचित्रट टिपण्यात आले आहे.
बारीक केस आणि मिशी अशा रांगड्या व्यक्तीमत्त्वाच्या लूकमध्ये सलमान या छायाचित्रात दिसतो. चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुल्तान अली खान यांची भूमिका साकारत आहे. यशराज  फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने करीत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून सलमान या चित्रपटासाठी बराच घाम गाळत आहे. सततच्या सराव शिबीरामुळे पाठ आणि गुडघे भरपूर दुखत असल्याचेही सलमानने सांगितले. सुलतान चित्रपट पुढील वर्षी ‘ईद’च्या मुहूर्तावर दाखल होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look salman khan sports handlebar moustache for sultan
First published on: 09-10-2015 at 17:46 IST