यश चोप्रा यांचे चित्रपट आणि लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी यांचे अतूट नाते होते. त्याच यश चोप्रांच्या नावाने चित्रपटसृष्टीत मोलाचा ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून पहिल्याच पुरस्कारासाठी लता मंगेशकर यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली आहे. उद्योजक-राजकारणी टी सुब्बरम्मी रेड्डी यांच्या ‘टीएसआर फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे  यश चोप्रा पुरस्कारांची सुरुवात करण्यात येणार आहे. अभिनेत्री सिमी गरेवाल, हेमा मालिनी, अनिल कपूर यांच्या निवड समितीने लता मंगेशकर यांच्या नावाची घोषणा केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी यश चोप्रा यांचे निधन झाले होते. त्याचदिवशी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First yesh chopra memory award to lata mangeshkar
First published on: 26-07-2013 at 03:16 IST