आपल्या सिनेमातून प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि मराठीचा रोमॅण्टिक हिरो स्वप्नील जोशी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा लव्हस्टोरीवर सुपरहिट सिनेमा व्हायलाच हवा ! या दोघांची ‘मितवा’ पासूनची मैत्री आजही अगदी घट्ट आहे. विशेष म्हणजे, हे दोघे जोशी असल्या कारणामुळे अगदी सख्ख्या बहिण भावासारखे वावरताना दिसतात. त्याचप्रमाणे सेटवर धम्माल मस्ती करण्यासोबतच नवख्या कलाकारांना टार्गेट करण्याची एक संधी देखील ही जोडी सोडत नाही. स्वप्ना-स्वप्नील या खोडकर भाऊ बहिणींच्या जोशीगिरीचा सामना यापूर्वी ‘मितवा’ मध्ये प्रथमच डेब्यू करणाऱ्या प्रार्थना बेहेरेला करावा लागला होता. तसेच ‘लाल इश्क़’ च्या सेटवर अंजना सुखानी हिला देखील या दोघांनी असेच बेजार केले होते. त्यामुळे साहजीकच ‘फुगे’ सिनेमाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करणारी नीता शेट्टीदेखील त्यांच्या कचाट्यातून वाचू शकली नाही.

या दोघांनी तिला डीओपी प्रसाद भेंडेच्या पाया पडून त्याला १०१ रुपयाची दक्षिणा देण्याची मराठीत रीत असल्याचे सांगितले. नीताने देखील ते खरे मानत तसे केले देखील! कहर म्हणजे प्रसादने देखील स्वप्ना-स्वप्नीलच्या या कारस्थानात भाग घेत, तिला आशीर्वाद देऊन, दक्षिणा देखील घेतली. एव्हढेच नव्हे, तर  सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर विषयीचे तिचे अज्ञान लक्षात आल्यावर, या दोघांनी तिला अगदी भांबावून सोडले होते. स्वप्नाने तर स्वप्नील बांदोडकरला समजलेय, आता तो तुझ्यावर रागावणार, असे काही बोलत तिला घाबरवून सोडले होते. मात्र हा सारा मस्करीचा भाग असल्याचे तिला समजताच तिने देखील ते हसण्यावारी घेतले.

Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
Rajwardhan Kadambande on Shahu Maharaj
“मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरकरांना माझे…”, राजवर्धन कदमबांडे काय म्हणाले?
jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

swapna-swapnil-1

स्वप्ना- स्वप्नीलच्या या जोशिगिरीमुळे ‘फुगे’च्या ऑफस्क्रीन सेटवर जशी धम्माल झाली, तशीच धम्माल रसिकांना या चित्रपटाच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.