अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असलेला हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत सीमा पाहवा, आलिया भट्ट, अजय देवगन, हुमा कुरैशी, शांतनु माहेश्वरी, विजय राज या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संजय लीला भन्साळींचं दिग्दर्शन असलेल्या चित्रपटासाठी या कलाकारांनी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. आलियानं या चित्रपटात माफिया क्वीन गंगूबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली आहे. आलियाला या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी आलियानं मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे. आलियानं या चित्रपटासाठी २० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे. याशिवाय या चित्रपटातील इतर कलाकारांनीही मानधन म्हणून मोठी रक्कम घेतली आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार

अभिनेत्री सीमा पाहवा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना या चित्रपटासाठी २० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. तर आलियाच्या प्रियकराची भूमिका साकारणारा अभिनेता शांतनू माहेश्वरीला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये एवढं मानधन मिळालं आहे. या चित्रपटातून शांतनूनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय अभिनेता अजय देवगण या चित्रपटात करीम लाला यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणनं या चित्रपटासाठी ११ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे.

आणखी वाचा- रश्मिकासोबत लग्नाच्या चर्चांवर विजय देवरकोंडानं सोडलं मौन, म्हणाला…

मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.