फॅशन ही काळानुरूप बदलत असली तरी रंगीबेरंगी कपड्यांच्या या फॅशनेबल जगतात गणवेशाचं एक वेगळं महत्व आहे. एकजूट तसंच एकतेचं प्रतिक असलेल्या गणवेशावर आधारित असलेला ‘गणवेश’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर लाँच सोहळा शुक्रवारी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत फेमस स्टुडिओ येथे संपन्न झाला..

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर कॅमेरामन म्हणून काम पाहणाऱ्या अतुल जगदाळे यांचा दिग्दर्शक म्हणून ‘गणवेश’ हा जरी पहिला चित्रपट असला तरी लेखनापासून ते सादरीकरणपर्यंत सर्वच पातळीवर त्यांनी मेहनत घेतली आहे. ‘गणवेश’बाबत बोलताना ते म्हणाले, ”आजवर रुपेरी पडद्यावर कधीही न आलेला विषय ‘गणवेश’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. गणवेशबाबत प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना असते. गणवेशाबाबत प्रत्येकाच्या मनात आपुलकीच्या भावनेसोबतच अनेक आठवणी दडलेल्या असतात. या आठवणींना या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळेलच. त्यासोबतच एका अर्थपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून गणवेशाचं आजवर कधीही समोर न असलेलं रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर याची कल्पना येते. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून ‘गणवेश’चा ट्रेलर तयार करण्यात आला असून तो प्रेक्षकांना हा चित्रपट पहाण्यासाठी प्रोत्साहित करेल, याबाबत शंका नाही. ‘गणवेश’च्या माध्यमातून एक दर्जेदार कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न आमच्या टीमने केला आहे.”

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?

‘ईरॉस इंटरनॅशनलची प्रस्तुती’ आणि ‘विजयते एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर, बाळकृष्ण शिंदे, अरुण गीते, अशोक पावडे, प्रफुल कांबळी, विजया पालव आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या भूमिका आहेत. तेजस घाटगे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. मराठीतील आघाडीचे गीतकार अशी ख्याती असलेल्या गीतकार गुरू ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून संगीतकार निहार शेंबेकर यांनी या गीतांना स्वरसाज चढविण्याचं काम केलं आहे. उर्मिला धनगर, तसंच नंदेश उमप या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीतरचना ऐकायला मिळणार आहेत. २४ जून रोजी ‘गणवेश’ चित्रपटगृहात दाखल होत आहे.

पाहा ‘गणवेश’चा ट्रेलर