बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अनोख्या अभिनय शैलीसाठी ओळखला जातो. शाहरुख हा प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. अलिकडेच पार पडलेल्या ‘इंडोनेशियन चित्रपट पुरस्कार २०१९’ सोहळ्यात शाहरुखच्या विदेशी फॅन फॉलोइंगची एक झलक पाहायला मिळाली. एका इंडोनेशियन अभिनेत्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर तो पुरस्कार शाहरुख खानला समर्पित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोल्ड मलायका आहे ‘न्यूड योगा गर्ल’ची फॉलोअर

या अभिनेत्याचे नाव ‘मुहम्मद खान’ असे आहे. त्याने पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुखचे आभार मानले. तसेच त्याने शाहरुखवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ हे गाणे गायले. आश्चर्याची बाब म्हणजे तो आपल्या संपूर्ण आयुष्यात शाहरुखला एकदाही भेटलेला नाही. त्याने केवळ शाहरुखचे चित्रपट पाहून अभिनय शिकण्यास सुरुवात केली आणि पाहाता पाहता आज त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

बॉलिवूड स्टार्सचे ‘डुप्लिकेट’ पाहून व्हाल चकित…

शाहरुखने देखील आपल्या या चाहत्याचा व्हिडीओ ट्विट करुन त्याला शुभेच्छा दिल्या. “तुला मिळालेल्या या पुरस्कारामुळे मला खुप आनंद होत आहे. आपली भेट लवकरच होईल. तु असाच अभिनय करत राहा, माझ्या तुला शुभेच्छा आहेत.” अशा शब्दात शाहरुखने मुहम्मद खानचे कौतुक केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesian actor thanks shah rukh khan in speech after award win mppg
First published on: 10-12-2019 at 12:28 IST