महाराष्ट्र गाजत असलेल्या जय मल्हार या मालिकेने घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे. आता खंडेराय म्हणजेच देवदत्त नागे आपल्याला क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळणार आहे.
आता तुम्हाला वाटले असेल की, देवदत्त आयपीएलमध्ये वगैरे उतोरतोय की काय? अगदी तसेच काही नसले तरी तुम्ही त्याला क्रिकेट खेळताना पाहू शकता हे मात्र नक्की. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या यंदाच्या पर्वात तो क्रिकेट खेळताना दिसेल. मराठी बॉक्स क्रिकेट लीग चे तिसरे पर्व कोल्हापूर येथे ४ ते ६ मे रंगणार आहे. या पर्वामध्ये धडाकेबाज नवी मुंबई या संघाकडून देवदत्त खेळणार आहे.  ” देवदत्तच्या आगमनाने  टीमचा उत्साह वाढला आहे. तो खूप पॉजिटीव्ह आणि डाऊन अर्थ आहे, आमच्या सोबत सराव करताना तो सर्व खेळाडूंसोबत इतरांसारखीच कसून मेहनत करतो असे कर्णधार सुहृद वार्डेकर म्हणाला.
धडाकेबाज नवी मुंबई या संघातून अजय चोपडे, अक्षया हिंडाळकर,सोनम डोंगरे,  किरण राजपूत, फरहीन मोमीन, कर्णधार सुहृद वार्डेकर आणि अक्षय म्हात्रे हेसुद्धा खेळणार आहेत.
IMG-20160501-WA0012

Rohit Sharma Rishabh Pant Kite Viral Video
IPL 2024: हे काय? सामना सोडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत मैदानात उडवत होते पतंग, VIDEO व्हायरल
Betting on IPL cricket matches Raid in Salisbury Park
पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; सॅलिसबरी पार्कात छापा
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान