जपानसाठी नववर्षाची सुरुवात भूकंपाच्या झटक्यांनी झाली. जपानमध्ये सोमवारी (१ जानेवारी ) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झालं असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भुकंपाच्या झटक्यांनंतर रस्ते व घरांची दूरवस्था झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास जपान सरकारने सांगितलं आहे. आतापर्यंत आठ जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे. याचदरम्यान, दाक्षिणात्य स्टार ज्युनिअर एनटीआर जपानमध्ये अडकला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर हा जपानमध्ये होता. भूकंपाचे धक्के आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर तो भारतात परतला आहे. त्याने भारतात सुखरुप परतल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली आहे. “जपानहून आज घरी परतलो आणि तिथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे मला धक्का बसला आहे. गेला संपूर्ण आठवडा मी तिथे घालवला आणि या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटतंय. सर्वकाही लवकरच ठिक होईल. मजबूत राहा, जपान,” असं ज्युनिअर एनटीआरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

जपानमध्ये किनारपट्टीच्या भागात डझनभरहून अधिक भूकंपाचे धक्के, घरांचं नुकसान, रस्त्यांना भेगा अन्…

दरम्यान, त्याच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते जपानमधील परिस्थिती सुधारावी यासाठी प्रार्थना करत आहेत. जपानच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, इशिकावा आणि परिसरात असलेल्या किनारपट्टीच्या भागात डझनभराहून अधिक भूकंपाचे धक्के बसले. त्यापैकी एकाची तीव्रता ७.६ ‘रिश्टर स्केल’ होती. यामुळे समुद्रात ३ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळू शकतात आणि इशिकावा, निगाता आणि तोयामा या भागात त्सुनामी येऊ शकते.