‘कभी खुशी कभी गम’ हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील ‘बोले चुडिया’ हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. १९ वर्ष जुनं हे गाणं आज एका इंडोनेशियन डान्स ग्रुपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इंडोनेशियामधील काही हौशी कलाकारांनी या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये केली जाणारी प्रत्येक मूव्हमेंट व सिनेमेटोग्राफी अगदी हुबेहुब चित्रपटातील गाण्यासारखीच आहे. गंमत म्हणजे हा चकित करणारा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी तुम्ही देखील गोंधळात पडाल.

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

‘कभी खुशी कभी गम’ हा मल्टिस्टारर चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ‘अमिताभ बच्चन’, ‘जया बच्चन’, ‘शाहरुख खान’, ‘हृतिक रोशन’, ‘काजोल’, ‘करिना कपूर’, ‘फरिदा जलाल’, ‘राणी मुखर्जी’ यांसारखे अनेक नामांकित कलाकार झळकले होते. या चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाणं त्यावेळी सुपरहिट ठरलं होतं. यापैकी ‘बोले चुडिया’ हे गाणं सध्या एका इंडोनेशिय डान्स ग्रुपमुळे चर्चेत आहे.