बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलीन चित्रपटांतील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, आता एका वेगळ्या कारणासाठी कल्कीचे नाव प्रकाशझोतात आले आहे. बालवयात आपले लैंगिक शोषण झाले असल्याची धक्कादायक कबुली कल्की कोचलीन हिने दिली. लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात कल्कीने बालपणी तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल उपस्थितांना सांगितले. माझ्या आयुष्यातील घटनेविषयी मला तुम्हाला सांगायचे आहे असे कल्कीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बालवयात मला लैंगिक शोषणासारख्या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. माझ्या ओळखीतील अनेकजण बालवयात लैंगिक शोषणाच्या अनुभवाला सामोरे गेले असल्याचे कल्कीने सांगितले. एरवी आपल्या भुतकाळातील वाईट प्रसंगांची वाच्यता न करणा-याविषयी बॉलीवूड तारका अतिशय सजग असताता. मात्र, कल्की कोचलीनने लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी जाहिररित्या तिला आलेल्या अनुभवाची कबुली दिली आहे. आपण दिलेल्या या कबुलीमुळे याप्रकारचा अनुभव आलेले इतर अनेकजण त्यांचे अनुभव आणि या सगळ्यातून त्यांनी काढलेला मार्ग याविषयी खुलेपणाने चर्चा करतील असा आशावाद कल्की कोचलीनने व्यक्त केला.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे