कपिल सिब्बल यांचे बॉलीवूडमध्ये पदार्पण!

चित्रपट सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणार आहे.

सिब्बल यांनी या चित्रपटासाठी 'तू ही तू' ही कव्वाली लिहीली असून सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग या कव्वालीला आवाज देणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. शोरगुल या आगामी चित्रपटासाठी कपिल सिब्बल यांनी गीत लेखन केले आहे. सिब्बल यांनी या चित्रपटासाठी ‘तू ही तू’ ही कव्वाली लिहीली असून सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग या कव्वालीला आवाज देणार आहे.
सुप्रसिद्ध झितारवादक निलाद्रीकुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. निलाद्रीकुमार यांच्याच आग्रहाखातर सिब्बल यांनी आणखी एका चित्रपटासाठी ‘तेरे बिना’ हे गाणे लिहीले आहे. हा चित्रपट सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणार आहे.
तेरे बिना हे गाणे नक्कीच सर्वांना आवडेल असा विश्वास कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. निलाद्रीकुमार यांच्यासोबत या गाण्यावर जवळपास नऊ महिने काम केल्याचे सिब्बल सांगतात. याशिवाय, केवळ एका विनंतीवर अरिजीत याने हे गाणे गाण्यास त्वरित होकार कळविल्याबद्दल देखील सिब्बल यांनी आभार व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kapil sibal wrote song for bollywood film