‘दादर अभिमान गीता’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. या व्हिडीओद्वारे आपल्या सर्वांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थातच अंकिता वालावालकरने सिनेसृष्टीत पदार्पण केले. अंकिताच्या या पहिल्या म्युझिक व्हिडीओवर तिच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

अंकिता वालावालकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या आई-वडिलांना ‘तूच मोरया’ या तिच्या पहिल्या गाण्याचा व्हिडीओ दाखवताना दिसत आहे. याबरोबरच ती तुम्हाला गाणं कसं वाटलं?याबद्दल विचारताना दिसत आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

अंकिताने विचारलेल्या या प्रश्नावर तिच्या आईने फारच मजेशीर प्रतिक्रिया दिली. “अगं गाणं छान आहे. पण याच्यापेक्षा तू नोकरी केली असतीस, तर बर झालं असतं”, असं अंकिताची आई म्हणते. त्यानंतर ती तिच्या बाबांना गाण्याबद्दल विचारते. त्यावर ते म्हणतात, “गाणं छान आहे. पण त्यापेक्षा तू लगीन कर.”

“मला आई सांगते नोकरी कर आणि बाबा सांगतात लग्न कर. तर अशी होती माझ्या आई-वडिलांची प्रतिक्रिया लग्न आणि नोकरी. गाणं नक्की बघा’, असे आवाहन अंकिताने तिच्या चाहत्यांना केले आहे.

आणखी वाचा : “मी खंबीररित्या जगू शकत नाही…”, ‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत मांडली व्यथा, म्हणाली “एक सेलिब्रेटी असल्याने…”

दरम्यान ‘तूच मोरया’ या म्युझिक व्हिडीओद्वारे अंकिता वालावलकर आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या गाण्याद्वारे देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वानी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे, याची अनोख्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.

एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो, असे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन प्रणिल हातिसकर यांनी केले आहे.

Story img Loader