पुणे : पत्नीशी वाद झाल्याने सासूरवाडीत आलेल्या एकाने सोसायटीच्या आवारातील १५ दुचाकी पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री पाटील (रा. वडगाव बुद्रूक ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री यांच्या मुलीचा गणेश याच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्यात वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून आली होती.
हेही वाचा…आतड्याला पीळ पडलेल्या चिमुरड्याला जीवदान! मिडगट व्हॉल्वुलस विकारावर यशस्वी उपचार
१ मे रोजी रात्री गणेश वडगाव बुद्रुकमधील सासूरवाडीत आला. गणेश सासूरवाडीत गेल्यानंतर त्याचा रात्री पुन्हा पत्नीशी वाद झाला. पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने सासू जयश्री यांची दुचाकी जाळली. शेजारी लावलेल्या १४ दुचाकींनी पेट घेतला. आगीत १५ दुचाकी जळाल्या.
हेही वाचा…भावी अभियंते गिरवणार आता अनुभवातून धडे! दोनशे तास प्रत्यक्ष कामाची मिळणार संधी
आरोपी गणेशने पत्नी आणि सासूला धडा शिकवण्यासाठी दुचाकी जाळली. काही क्षणात आग भडकली. सोसायटीच्या आवरात लावण्यात आलेल्या अन्य दुचाकींनी पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली, अशी माहिती पोलिसांनी दिली.