NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. ड्रग्ज पेडलर्सकडून गोरेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला. यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘समीर वानखेडे हे ठीक आहेत’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

‘तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एनसीबीच्या संपूर्ण टीमला सलाम. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’, असं तिने लिहिलं.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. त्यांच्यासह त्यांच्या टीमवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा- जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?; एनसीबी अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर भाजपाचा सवाल

समीर वानखेडे हे कॅरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास गेले होते. ड्रग पेडलर कॅरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती.