‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका नुकतीच सुरू झाली. पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. सध्या ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे.

सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडलीय. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विधीप्रमाणेच काहीशी अवस्था विश्वासची आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी विश्वास आणि काव्या काय निर्णय घेतात याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जिवलगा’ या मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.

Harbhajan Singh wants to see Virat Kohli as RCB captain in the next season of IPL
IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला
Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
Wasim Akram Statement on Virat kohli Sunil Gavaskar spat over Strike rate
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Goldy Brar
अमेरिकेतील गोळीबारात गोल्डी ब्रारचा मृत्यू? पोलीस म्हणाले, “मारला गेलेला व्यक्ती…”
crime against minor
बलात्कार पीडितेला मदत केली म्हणून हिरो झाला, आता अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत
hardik pandya, Twenty20 World Cup, vice-captain, loksatta explained article
विश्लेषण : फॉर्म नाही, नेतृत्व नाही तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक उपकर्णधार कसा? त्याच्यावरील विश्वास भारतासाठी घातक ठरणार?
vasai minor girl rape marathi news, minor girl raped twice in vasai marathi news
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येत आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.