अर्धवट आणि कर्णोपकर्णी मिळालेल्या माहितीच्या आधारे जे सत्य समोर येते, त्या सत्यातून अनेकदा गैरसमजाचेच चित्र निर्माण होते. या गैरसमजुतीमुळे नात्यांमध्ये येणारा मानसिक ताण, त्यातून दुरावा हे स्वाभाविकपणे आलेच. याच ताणाचे दर्शन घडविणारे ‘अर्धसत्य’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले आहे. पुण्यात त्याचा नुकताच प्रयोगही झाला.

‘गैरसमजुतीतून निर्माण झालेला ताण सहन करता आला, त्याला योग्य प्रकारे हाताळता आले तर ठीक, नाही तर मग तो उग्र रूप घेतो. आई-मुलाच्या नात्यात वडिलांच्या अकाली निधनानंतर आलेला ताण आणि विक्षिप्त नवऱ्याच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत, ही बोच घेऊन जगणारी सोशीक स्त्री असा संघर्ष या दोन अंकी नाटकात मांडला आहे,’ अशी माहिती लेखक-दिग्दर्शक नितीन बगवाडकर यांनी दिली.

Savitri Khanolkar Swiss born woman who designed the Param Vir Chakra award Eve Yvonne Maday de Maros
स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र
eknath shinde
Budget 2024 : “नवरत्न अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब”, बजेटवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Union Minister Nitin Gadkari asserted that self reliance depends on easy economic policy amy 95
सुलभ आर्थिक धोरणावरच आत्मनिर्भरता अवलंबून; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
A land developer cheated a woman by selling the same plot to two people
Nagpur Crime Update: एकाच भूखंडाची दोघांना विक्री…महिलेची फसवणूक
Dilip Parbhavalkar While in Drama Patra-Patri
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांच्या मनात श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, ‘पत्रापत्री’च्या प्रयोगांची चर्चा
actor dilip prabhavalkar remembered letter written by dr shriram lagoo
दिलीप प्रभावळकरांची खास पत्राची आठवण; ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे जोरदार प्रयोग
jitendra awhad on ladki bahin yojana
“लाडक्या बहिणींकडून १०० रुपये घेता, लाज वाटत नाही का?”; जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर टीका!

हेही वाचा >>> नाट्यरंग : ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ – टक्का टक्का… झुठा झुठा…

बगवाडकर यांच्या या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकातील शशांकच्या भूमिकेतील अमित नगरकर, तर सुमनच्या भूमिकेतील प्राची देशपांडे एकमेकांना आणि प्रेक्षकांनाही प्रेमळ अनुभूती देतात. गायत्री रास्ते यांनी कुचंबणाग्रस्त आई रंगवली आहे. तर सतीश चौधरी यांनी विक्षिप्त नवऱ्याची भूमिका वठवली आहे. मुलीच्या आईची काळजी घेऊन वावरत असताना, मुलीला समजून घेणाऱ्या आणि समजून सांगणाऱ्या आईमध्ये सीमा पोंक्षे रंग भरतात.

नाटकाचे कथानक दोन कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटनांमधून पुढे सरकत असताना विक्षिप्त नवऱ्याच्या सान्निध्यात मुलाला शिकवून मोठे करण्याचा आईचा ध्यास तिला संसारात रमायला भाग पडतो. मुलगा मोठा होतो, कमावता होतो, पण त्या दरम्यान विचित्र परिस्थितीत नवऱ्याचे निधन होते. नवऱ्याच्या निधनाला आपणच कारणीभूत असल्याची सल मनात घेऊन जगणाऱ्या तिच्या वागणुकीमुळे मुलाचे लग्नाचे विचार बदलतात. आईची मानसिक अवस्था नक्की कशामुळे बिघडते, तिला काय त्रास होऊ लागतो, तिच्या त्रासामुळे मुलाला काय सहन करावे लागते, मुलाच्या लग्नाचे काय होते, हे या नाटकात दाखविण्यात आले आहे.

नेपथ्य कुणाल शहा यांचे, ध्वनिसंयोजन मदन करजगी, प्रकाशयोजना श्रीकृष्ण देशपांडे, तर रंगमंच व्यवस्था कस्तुरी कुबल यांची आहे. नाटकाची निर्मिती उल्का बगवाडकर यांनी केली आहे.