वय हा निव्वळ एक आकडा आहे हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यावर लक्षात येत. मलायकाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉग्स केल्याचं पाहायला मिळालं आहे. वयाच्या ४४ वर्षीही मलायका एखाद्या २१ वर्षीय तरुणीप्रमाणे स्वत: ला मेंटेन करुन आहे. त्यामुळे तिने वयाची ४० ओलांडली आहे हे पाहणाऱ्याला खरं वाटणार नाही. तिच्या याच ग्लॅमरस अंदाजामुळे ती पुन्हा एकदा आयटम साँग करण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेता अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आलेली मलायका अरोरा कायम तिच्या वेशभूषेवरुन सोशल मीडियावर ट्रोल होत असते. मात्र या साऱ्याकडे दुर्लक्ष करत मलायका स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. तिच्या याच फिटनेसमुळे तिला पुन्हा एकदा आयटम साँग करण्याची संधी मिळाली असून ती लवकरच विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटामध्ये आयटम साँग करताना दिसून येणार आहे.

दरम्यान, ‘पटाखा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चरण सिंह पाठिक यांच्या ‘दो बहनें’ कथेवर हा आधारित आहे. या चित्रपटाचं कथानक राजस्थानच्या एका गावातील दोन सख्या बहिणींभोवती फिरताना दिसून येणार आहे. ‘पटाखा’मध्ये सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान या प्रमुख भूमिकेमध्ये असून या चित्रपटातील एका आयटम साँगच्या माध्यमातून मलायकाचा चित्रपटात प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा  मलायकाच्या चाहत्यांना ती नव्या आणि ग्लॅमरस अंदाजात दिसून येणार आहे यात शंका नाही. मलायकाने आतापर्यंत ‘छैय्या, छैय्या’, ‘मुन्नी बदमान’ या सारखं प्रचंड गाजलेल्या आयटम साँगमध्ये आपलं नृत्य कौशलं दाखविलं आहे.