लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेने नेहमीच चर्चेत असते. ‘देवयानी’ या मालिकेतून शिवानी घराघरांत पोहचली. काही महिन्यांपूर्वीच तिचा झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसादम मिळाला होता. मराठीबरोबर शिवानीने हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता लवकरच शिवानी ‘ऊन सावली’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर भूषण प्रधानची प्रमुख भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

‘ऊन सावली’ हा चित्रपट प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. ‘एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते’ ह्या वाक्यात ‘ऊन सावलीचे’ गूढ लपलेले आहे. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत. पहिल्या भेटीतच प्रणयला आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. तिच्या मनात तर वेगळाच गोंधळ चालू आहे. हा चित्रपट लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःशी जोडणारा आहे.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

तिकीट विंडो पिक्चर्स बॅनरअंतर्गत समीर ए शेखद्वारा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सार्थक नकुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात भूषण व शिवानीबरोबर अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १५ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.