सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ या चित्रपटाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. १० नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, देविका दफ्तरदार, भार्गव जगताप अशी कलाकार मंडळी ‘नाळ २’ मध्ये पाहायला मिळत आहेत. नुकतीच दिग्दर्शक विजू माने यांनी ‘नाळ २’ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – “… तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीतरी वेगळाच असता”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ व्यक्तीसाठी खास पोस्ट

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

दिग्दर्शक विजू माने हे प्रत्येक नव्या मराठी चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त करत असतात. नुकतंच ते ‘नाळ २’ चित्रपटाविषयी बोलले. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे की, पोस्टरवरचा पॉप्युलर हिरो, दिलखेचक हिरोईन, धमाल गाणी, धुवाधार ॲक्शन, टाळ्यांचे संवाद इत्यादी काहीssssही नसलेला हाउसफुल सिनेमा पाहायला नशीब लागतं. जे मला काल ‘नाळ 2’च्या रुपाने लाभलं. अत्यंत संयत दिग्दर्शन, सर्वच कलाकारांचा सहज सुंदर वावर (मी ‘अभिनय’ म्हणणार नाही.) नेत्र सुखद सिनेमॅटोग्राफी आणि शंभर पैकी ११० मार्क द्यावेत इतकं उत्तम कास्टिंग.

पुढे विजू माने यांनी लिहीलं आहे, “अनेकदा इकडून तिकडे उड्या मारल्या की उत्तम पटकथा होते असा भोळा समज असतो. परंतु बांधीव पटकथा तुमच्या आशयाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. याचं ‘नाळ 2’ हे अत्यंत समर्पक उदाहरण असेल. नाळच्या (भाग १) पहिल्या फ्रेम मधून सुरू झालेल्या अलगद पिसाचा, विहिरीत हलकेच जाणाऱ्या फुलांपर्यंतचा प्रवास त्या पिसा आणि फुला इतकाच तरल पणे आपल्या हृदयात शिरतो. या आणि अशा अनेक प्रतीकांमधून सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लेखणीसहित कॅमेऱ्यानेही चित्रपट सुंदर रेखाटला आहे. एक चित्रपटकर्ता म्हणून अनेकदा असं वाटून गेलं की आपल्या आतूनही अशी एखादी कलाकृती घडून जायला हवी, मला वाटतं सिनेमा म्हणून या नाळ दोनच हे सुद्धा यश आहे.”

हेही वाचा – “… तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीतरी वेगळाच असता”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ व्यक्तीसाठी खास पोस्ट

“आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला आवडली ती म्हणजे यातील पात्रांच्या रचना आणि त्यांचा एकमेकांशी असलेला प्रतिकात्मक संबंध हा अगदी सामान्य प्रेक्षकालाही कळतो. अनेकदा गुंतागुंतीच्या पात्र रचना करून दिग्दर्शक प्रेक्षकाला खूप जास्त विचार करायला भाग पडतो. ते एका अर्थी चांगलं असेलही, परंतु मला मात्र तसे सिनेमे फारसे आवडत नाहीत. आपण माजिद मजीदीच्या सिनेमांचं भरभरून कौतुक करतो. त्यातला तरलपणा फार अभावाने आपल्या सिनेमांमध्ये दिसतो. जो मला ‘नाळ २’मध्ये दिसला. कुठलाही अविर्भाव नसलेला हा अत्यंत नैसर्गिक आणि निरागस सिनेमा निखळ आनंद देऊन जातो. सिनेमाच्या सर्व टीमचे आणि अशा सिनेमाच्या मागे उभे राहिल्याबद्दल द नागराज मंजूळे आणि झी समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन,” असं विजू माने यांनी लिहीलं आहे.

हेही वाचा – सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या ५ वर्ष आधीपासून होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

विजू माने यांनी केलेलं कौतुक वाचून ‘नाळ २’ चित्रपटाचे निर्माते मंगेश कुलकर्णी आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आभार मानले आहेत. “मनःपूर्वक धन्यवाद विजू”, असं त्यांनी पोस्टच्या प्रतिक्रियेत लिहीलं आहे.