‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमी चर्चेत असते. ‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकांमधून सोनाली घराघरात पोहोचली. पण खऱ्या अर्थाने तिला ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक लोकप्रिय मिळाली. बिग बॉसमधला तिचा खेळ पाहून तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करत असते. नुकतीच सोनालीने तिच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या ५ वर्ष आधीपासून होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
chat with terav marathi movie team members
‘तेरवं’ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची संघर्ष कथा

अभिनेत्री सोनाली पाटीलच्या आयुष्यातील ही महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तिची आजी. तिने तिच्या आजीबरोबर एक रील शेअर करून सुंदर पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सोनालीने लिहीलं आहे की, “तर ही आहे माझी ‘आजी’… आईची आई तिला सगळे प्रेमाने “आऊ” म्हणतो …तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचा आणि तिच्या अनुभवांचा माझ्यासाठी, माझं आयुष्य जगण्यासाठी आणि ते सोप करण्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे…कारण ती आजही प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक गोष्टीतून नवीन काहीतरी शिकवत असते आणि मला ते सगळं तिचं ऐकायचं असतं… आत्मसात करून माझ्या आयुष्यामध्ये उतरवायचा असतं…असं एका शब्दात नाही सांगता येणार पण तिची ‘दुनियादारी’ तिचा प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही औरच आहे… कदाचित जर मी तिला ऐकलं नसतं तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीतरी वेगळाच असता ….पण आता मी जशी काय आहे ते तिच्यामुळे…”

हेही वाचा – Video: आदर्श शिंदेच्या लेकीनं काकाच्या जोडीनं बनवला किल्ला; उत्कर्ष व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझी पुतणी…”

“तिच्या संस्कारांमध्ये वाढले, आपण इतरांसाठी त्यांच्या सुखासाठी कसं जगलं पाहिजे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या हास्यसाठी आपण काय केलं पाहिजे असं एक ना अनेक हे सगळं मी तिच्याकडून शिकले…ती सारखी म्हणते अगं लहान बाळ असलं तरी त्याचा ऐकायचं कारण ते सुद्धा आपल्याला जे सांगत असतं त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं… म्हणून निदान त्याचं ऐकून तरी घ्यायचं आणि यातून नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतात… तिचे बरेच फंडे मी ऐकत असते आणि फॉलो पण करत असते बरं का… तर ही माझी आऊ … तिच्याबरोबर मी रील केला खरा पण तिला खोटं सांगून की हा व्हिडिओ फक्त आपल्या दोघींसाठी आहे… पण आता तुम्हा सगळ्यांना सांगते हे आपल्यातलं सिक्रेट आपल्यातच राहू दे बरं का…,” असं आजीविषयी सोनालीने लिहीलं आहे.

हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? सध्या प्रेक्षकांच्या मनावर गाजवतायत अधिराज्य

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय व शाहरुख खान रुपेरी पडद्यावर घालणार धुमाकूळ; दिग्दर्शक अ‍ॅटलीने आगामी चित्रपटाची केली घोषणा

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं फक्त मराठी मालिकांमध्येच काम केलं नसून हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.