Premium

गिरीजा ओक आणि सई ताम्हणकर ‘अशा’ झाल्या खास मैत्रिणी; अभिनेत्री म्हणाली, “ती माझ्या आजोबांकडे…”

गिरिजा ओक आणि सई ताम्हणकर यांच्या मैत्रीची सुरूवात कुठे झाली? जाणून घ्या…

girija oak and sai tamhankar friendship
गिरीजा ओक आणि सई ताम्हणकर ( फोटो : सई ताम्हणकर फेसबुक )

सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोकांना सईने तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आपलंसं केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री गिरीजा ओक आणि सई या दोघींची फार घट्ट मैत्री आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा ओकने सईबरोबरच्या मैत्रीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “रक्ताच्या उलट्या झाल्या”, आदेश बांदेकरांनी सांगितला ‘तो’ जीवघेणा प्रसंग; म्हणाले, “उद्धव साहेबांच्या फोनमुळे…”

अभिनेत्री गिरीजा ओकसाठी २०२३ चा सप्टेंबर फारच खास ठरला कारण, तिचे दोन हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. गिरीजाने शाहरूख खानच्या ‘जवान’मध्ये आणि विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यानिमित्त तिने अलीकडेच ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीला सईबरोबर तिचं नातं कसं आहे? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर गिरीजा म्हणाली, “आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती नेहमी असावी, जिने खून केल्यावर तू का खून केलास? असं विचारण्यापेक्षा ये माझ्या मागे लप असं सांगावं. माझं आणि तिचं नातं एवढं घट्ट आहे.”

हेही वाचा : Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

गिरीजा पुढे म्हणाली, “आम्ही दोघी खूप आधीपासून मैत्रिणी आहोत. सांगलीत आमची ओळख झाली. तेव्हा आम्ही अभिनय क्षेत्रात काम करत नव्हतो. ती सांगलीत राहायची आणि माझं आजोळ सांगलीचं आहे. ती माझ्या आजोबांकडे फ्रेंच शिकायला यायची. त्यामुळे आमच्यातील मैत्री वाढू लागली. पहिल्यांदा सई जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती फार कोणाला ओळखायची नाही. त्यामुळे तेव्हा आम्ही दोघी एकत्र असायचो.”

हेही वाचा : “कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे…” प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला, “रुमाल रक्ताने…”

“माझं तिच्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि त्याहून जास्त मला तिचा अभिमान वाटतो. कारण, एवढ्या कमी वेळात तिने खूप काही मिळवलंय ते देखील स्वत:च्या हिंमतीवर…सईसारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात असल्याचा मला प्रचंड गर्व आहे.” असं गिरीजा ओकने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girija oak talks about her friendship with sai tamhankar sva 00

First published on: 04-10-2023 at 12:23 IST
Next Story
“सतीश तारेंसारखा दुसरा नट…”, वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “त्यांना किंग ऑफ टायमिंग…”