अभिनेत्री शिवानी सुर्वे छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर हळुहळू ती चित्रपटांकडे वळली. नुकताच तिचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. खऱ्या आयुष्यात शिवानी गेली अनेक वर्षे अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात अभिनेत्रीने अजिंक्यबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवानी म्हणाली, “‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेमुळे अजिंक्य आणि माझी भेट झाली. खरंतर, त्या मालिकेत अजिंक्यची एन्ट्री मध्येच झाली होती. त्याच्या एन्ट्रीनंतर ३ महिन्यांनी ती मालिका बंद झाली. तेव्हा आमची एकमेकांशी अगदी बेसिक हाय-हॅलो करण्यापर्यंत मैत्री होती. पण, मालिका संपल्यावर हे काहीतरी वेगळं आहे याची जाणीव मला झाली. आपण इतर खूप कामं करतो, त्यानंतर घरी जातो…कोणाच्या आयुष्यात जास्त दखल देत नाही. पण अजिंक्यच्या बाबतीत मी सारखी प्रत्येक गोष्टीची दखल घेत होते आणि यापुढेही घेत राहीन. अशारितीने आमच्या नात्याला सुरूवात झाली होती.”

हेही वाचा : “६ पानांचा अन् सलग ६ मिनिटांचा सीन”, ‘झिम्मा २’ चित्रपटाबद्दल हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, “मी लपून बसलो…”

शिवानी पुढे म्हणाली, “तो खरंच खूप जास्त चांगला आहे. आमचे स्वभाव एकदम विरुद्ध आहेत. मी जेवढी बोलते किंवा व्यक्त होते तो माझ्या या स्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. अजिंक्य खूप जास्त शांत आणि समजूतदार आहे. मालिका संपल्यावर आमच्या भेटीगाठी वाढल्या, एकत्र दिवस घालवणं या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आम्ही एकमेकांना कधीच प्रपोज वगैरे केलं नाही. एकत्र आलं पाहिजे असं आम्हाला मनातून वाटलं.”

हेही वाचा : ‘अस्मिता’ फेम मयुरी वाघने खरेदी केलं नवीन घर! गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या स्वप्नांच्या…”

“२०१५-१६ च्या दरम्यान आमच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये आम्ही आमच्या नात्याबद्दल घरी सांगितलं होतं. मी माझ्या आईला सर्वात आधी कल्पना दिली होती. त्यानेही त्याच्या घरी सांगितलं आणि दोन्ही घरातून आमच्या नात्याला ठळक विरोध आला. हे फक्त आकर्षण आहे असं आमच्या घरच्यांचं मत होतं. तुम्हाला वाटत असेल तुमचं प्रेम खरं आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा, तर तुम्ही दोघेही आम्हाला एकत्र राहून दाखवा असं आम्हाला घरुन सांगितलं गेलं. आता अजूनपर्यंत आम्ही त्यांना एकत्र राहून दाखवत आहोत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर आई-बाबांना आमच्या नात्यावर विश्वास बसला. त्याचे बाबा म्हणाले, जर तुम्ही लॉकडाऊन न भांडता काढताय, तर तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकता. त्यामुळे असं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने ४ वर्षांनंतर आमच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली. आता सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत लवकरच आम्ही चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ.” असं शिवानी सुर्वेने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 fame shivani surve talks about her relationship with boyfriend ajinkya nanaware sva 00
First published on: 08-12-2023 at 12:52 IST