Pooja Sawant Siddhesh Chavan Haldi Ceremony: अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सिद्धेश चव्हाणबरोबर पूजाचं लग्न होणार असून आतापर्यंत मेहंदी, हळदी, संगीत समारंभ झाला आहे. आता पूजा सिद्धेशशी लग्नगाठ बांधून दोघं आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या पूजा व सिद्धेशच्या मेहंदी, हळदी, संगीत समारंभातील फोटो व व्हिडीओ चर्चेत आले आहेत.

पूजाच्या हळदीतल्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये पूजा प्रीती झिंटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पूजाचा हा व्हिडीओवर व्हिडीओ ‘सिने अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या पन्नाशीत देणार बाळाला जन्म, पुढच्या महिन्यात पाळणा हलणार!

हळदी समारंभासाठी पूजाने खास जांभळ्या रंगाच्या लेहेंग्याची निवड केली होती. सुंदर लेहेंगा, आकर्षक हेअरस्टाइल, हातात हिरवा चुडा अन् सिद्धेशची नवरी असं लिहिलेली कलाई असा लूक अभिनेत्रीने हळदी समारंभासाठी केला होता. यावेळी पूजाने प्रीती झिंटाच्या ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर डान्स केला.

हेही वाचा – ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्याची ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने खास पोस्ट, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाला, “या माणसाने…”

दरम्यान, पूजाचं हे लव्हमॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. अभिनेत्रीचा होणारा नवरा सिद्धेश ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे.