‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सिद्धेश चव्हाणशी काल (२८ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकली. पूजा आता मिसेस चव्हाण झाली आहे. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला असून लग्नाचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

लग्नासाठी पूजा व सिद्धेशने खास मराठमोळा लूक केला होता. पूजाने गुलाबी काठ ज्यावर सोनेरी नक्षी काम असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तसंच यावर त्याने फेटा घातला होता. लग्नातील दोघांच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, पूजाचं अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता तिने लव्ह मॅरेज असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – सिद्धेशचा पहिल्यांदा फोटो पाहताच घाईघाईत निघालेली पूजा सावंत थांबली अन्…; किस्सा सांगत म्हणाली…

अभिनेत्री पूजा सावंतने नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “मी आमचं अरेंज मॅरेज म्हणणार नाही. आम्ही अरेंज मॅरेज पद्धतीनेच भेटलो. मला त्याचं स्थळ आलं. आम्ही फोनवर आधी बोललो. जसं टिपिकल अरेंज मॅरेज होतं, तसंच आई-बाबांनी स्थळ आणलं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळ घेतला. दीड वर्ष आम्ही फोनवर बोलत होतो. आता त्याला दोन वर्षही होतील. हळूहळू प्रेमात पडलो, हळूहळू एकमेकांना जाणून घ्यायला लागलो. आम्ही एकत्र कुटुंब पिकनिकला सुद्धा गेलो होतो. त्यामुळे हे अरेंज मॅरेज नव्हतं. लव्ह मॅरेज होतं.”

हेही वाचा – Video: शिवानी बावकर-आकाश नलावडेच्या ‘साधी माणसं’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो समोर, मराठी कलाकार म्हणाले…

पूजाचा नवरा सिद्धेश हा अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्यामुळे पूजा आता काही वर्ष ऑस्ट्रेलियातून येऊन जाऊन काम करेल, असं ती ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये म्हणाली होती.