मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेत्री शिवानी सुर्वे हे नाव कायमच आघाडीवर असतं. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सिझन २ मुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. सध्या शिवानी ही 'झिम्मा २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिच्या पात्राचा उलगडा झाला आहे. चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत.आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र, नवीन पोस्टर आलं समोर यानिमित्ताने शिवानी सुर्वेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने या चित्रपटात कोणती भूमिका साकरणार आहे, याचा खुलासा केला आहे. "तुम्हा लोकांना वाटतं एखाद्याला काही परवडलं नाही की काय ट्रॅजेडी झाली! बोलणं विषारी पण मन भारी, झिम्मा २ ची नवी खेळाडू! भाचीबाई.. मनाली! ‘झिम्मा २’, २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…", असे कॅप्शन शिवानी सुर्वेने या पोस्टला दिले आहे. शिवानी सुर्वे ही या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांची भाचीचे पात्र साकारत आहे. तिच्या पात्राचे नाव मनाली आहे. तिची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. आणखी वाचा : “#wowhemantsir…”, सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टवरील हॅशटॅगची सर्वत्र चर्चा, हेमंत ढोमे म्हणाला “काय गरज…” दरम्यान हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.