संपूर्ण जगभरात वाराणसी शहराला धर्मनगरी म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी लाखो भाविक या शहराला मोठ्या भक्तिभावाने भेट देत असतात. सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी गंगेच्या काठावर होणारी गंगा आरती पाहण्याची इच्छा असते. सध्या एका मराठी अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

मराठीप्रमाणे बॉलीवूड कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामीला ओळखलं जातं. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात तिने आकृती दवे ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या वैदेहीने शेअर केलेल्या गंगा आरतीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : शाहरुखचे ‘जबरा फॅन्स’! मन्नतबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी, किंग खानने लेक अबरामसह दिल्या ईदच्या शुभेच्छा

अभिनेत्री गंगा किनारी मनोभावे पूजा करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय गंगा आरतीची झलक सुद्धा वैदेहीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. “हर हर गंगे” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हेच गाणं तिच्या व्हिडीओला जोडलं आहे.

हेही वाचा : “बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या”, हेमंत ढोमेच्या फोटोवर पत्नी क्षितीची भन्नाट कमेंट; म्हणाली…

दरम्यान, वैदेहीने शेअर केलेला हा सुंदर पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ सीरिजमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.